मतदारांमध्ये चर्चा
मूल (प्रतिनिधी): मूल नगर परिषदेची निवडणुक येत्या 2 डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी कॉंग्रेसने एकता समर्थ यांची उमेदवारी जाहिर केली आहे, त्यांच्या तोडीला तोड देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने इंजि. शिवाणी आगडे यांना उमेदवारी दिल्यास ते तगडे उमेदवार ठरू शकतात. अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. Shivani Agade
गत साडेचार वर्षानंतर मूल नगर परिषदेची निवडणुक होत आहे. नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्रि करीता नगराध्यक्षपद राखीव आहे. यासाठी भाजपाकडे 15 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून पक्षकडे दिलेले आहे. यापैकी सध्यातरी चार इच्छुक उमेदवारांबाबत पक्षश्रेष्ठी विचार विनीमय करीत आहे, परंतु यापैकी कॉंग्रेसच्या उमेदवारापुढे इंजि. शिवाणी संदिप आगडे या तगडे उमेदवार ठरू शकतात. BJP
मूल नगर परिषदेवर भाजपा आणि कॉंग्रेस पक्षाने आपआपलेे झेंडे फडकविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कॉंग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाचे उमेदवार एकता प्रशांत समर्थ यांच्या नावावर मोहोर लावलेली आहे. काही प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवारही ठरलेले आहेत, फक्त जाहिर केलेले नाही. भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारचे नाव अजुनही गुप्त ठेवलेले आहे. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते मलाच उमेदवारी मिळेल याआशेने मतदाराच्या भेटीगाठी सुरू केलेल्या आहेत. मूल नगर परिषद अध्यक्षपदासाठी भाजपाकडुुन चार नावाची चर्चा जोर धरलेली आहे, मात्र यापैकी इंजि. शिवाणी संदिप आगडे या इच्छुक उमेदवार भाजपासाठी तगडे उमेदवार ठरू शकतात, आणि त्यांना भाजपाने उमेदवारी दिल्यास ते कॉंग्रेस पक्षासाठी अडचणीचे ठरू शकते असा सुर काही मतदारांकडुन ऐकायला मिळत आहे. Ekta Samarth







