निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक भाजपा नेते शोभाताईच्या भेटीला Election

Shobhatai Fadnvis
Shobhatai Fadnvis

मूल नगर परीषद निवडणुक रंगतदार होणार

मूल (प्रतिनिधी): जिल्हयातील भाजपा नेत्यांमधील अंतर्गत वादामुळे मूल तालुक्यातील भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते, नेते माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचेकडे जाणे टाळत असल्याचे अनेकदा दिसुन आले मात्र मूल नगर परिषदेची निवडणुकीचे बिगुल वाजले आणी कॉंग्रेस-भाजपाच्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल करताच भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह येथील स्थानिक नेत्यांनी शोभाताई फडणवीसांची भेट घेतल्याने निवडणुकीच्या ऐन तोंडावरच स्थानिक नेत्यांना जाग कशी ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. Shobhatai Fadanvis

येत्या २ डिसेंबर रोजी मूल नगर परीषदेची निवडणुक होत आहे, होवु घातलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडुन नगराध्यक्ष पदासाठी प्रा. किरण किशोर कापगते यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. इंजी. शिवाणी संदिप आगडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा सुरू असतांनाच दोन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दबावाखाली प्रा. किरण किशोर कापगते यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. त्यांनी १७ नोव्हेंबर रोजी येथील निवडणुक निर्णय अधिकारी यांचे समक्ष व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन अर्ज दाखल केले. . त्यांनंतर दुस-यांच दिवशी १८ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. किरण किशोर कापगते, भाजपाचे शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले, प्रभाग क्रं. १ चे उमेदवार अजय गोगुलवार, भाजपा नेते मोतीलाल टहलियांनी, माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांचेसह भाजपाचे अनेक स्थानिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. BJP

मूल तालुक्यातील भाजपाचे अनेक नेते माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या मार्फतीने आपली अनेक काम करून घेतात, मात्र याची माहिती जिल्हातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना होवु नये यासाठी मोठी गुप्तताही पाळतात. परंतु निवडणुकीच्या ऐन तोंडावर मात्र ही गुप्तता न पाळता निवडणुकीचा प्रचाराचा मुहुर्त माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा आशिर्वाद घेवुन तर केले नाही ना अशी खमंग चर्चा मूल शहरात सुरू आहे. Election