तिन पिढयाची जाचक अट रद्द करा : राहुल संतोषवार
पोंभुर्णा (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्हयात गेल्या अनेक वर्षापासुन वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात राहतात, मात्र शासनाने तिन पिढयाची जाचक अटीमुळे शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या शेतीचे पट्टे मिळण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत, यामुळे शासनाने तिन पिढयाची जाचक अट रद्द करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील घनोटी तुकुम व परिसरातील अनेक गावातील शेतकरी वन जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेत, सदर शेतकरी मागील 60 ते 70 वर्षापासून धानपिकाचे उत्पन्न घेत आहेत, शेतीचे पट्टे मिळावे यासाठी सन 2018 पासून शासनाकडे वन हक्क प्रस्ताव पाठविलेले होते परंतु तीन पिढीच्या जाचक अटीमुळे सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. यामुळे पोंभुर्णा येथील वनपरिक्षेत्राधिकारी यांनी 12 जानेवारी रोजी शेतकऱ्यांना नोटीस पाठवुन अतिक्रमण केलेल्या वन जमिनी सोडण्यास सांगितले आहे, वनविभागाच्या यानिर्णयामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष पसरलेले आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन कसत असलेल्या शेतीवर वनविभागाने दावा करीत शासन जमा करण्याच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे शासनाने तिन पिढयाची जाचक अट रद्द करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी आमदार मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.