भाजपा जिल्हाध्यक्ष भोंगळे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
अतुल कोल्हे भद्रावती :-भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांच्या संकल्पनेतून भद्रावती तालुक्यातील कोची गावात भाजपा युवा मोर्चा आपल्या दारी या उपक्रमाला ९ मार्च रोज बुधवारला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली.
केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने समाजातील विविध घटकांसाठी नवनवीन योजना सुरु केल्या आहेत. पण अज्ञान आणि वाहतुकीचा प्रश्न यामुळे अनेकांना तालुक्याला येवून त्या योजनाच्या मोबदल्या साठी अर्ज करणे शक्य होत नसल्याचे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांच्या लक्षात येताच माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज भैया अहिर ,माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार , भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या मार्गदर्शनात शासन आपल्या दारी या उपक्रमासारख्या नवीन अशा उपक्रमाची निर्मिती करून विविध योजनांची माहिती , शासकीय दाखले यांच्या करिता अर्ज , शासनाच्या विविध योजना , ई श्रम कार्ड, जात प्रमाणपत्र , उत्पनाचा दाखला , जात पडताळणी प्रमाणपत्र , राष्ट्रीयत्व , अधिवास व वयाचे प्रमाणपत्र , नॉन क्रीमिलीयर प्रमाणपत्र , स्वघोषणा पत्र , संजय गांधी व श्रावणबाळ (वयोवृद्ध ) निराधार योजनांचे अर्ज , विवाह नोंदणी , जन्म , मृत्यु नोंदणीचे अर्ज , रमाई घरकुल आवास योजनेचे अर्ज , महिती अधिकार अ, ब , क अर्ज , स्वस्त धान्य दुकानदार यांच्या प्रमाणपत्रा करिता अर्ज , महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कामगार ( पेटीचे अर्ज ) या योजने अंतर्गत मोफत व योग्य मार्गदर्शनाखाली करून मिळणार आहे . तरी या कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी केले आहे . या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले,जिल्हा परिषद सदस्य यशवंत वाघ, जिल्हा परिषद सदस्या अर्चना जीवतोडे , भाजपा तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे , भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे , व प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजयुमो प्रदेश सचिव अनिल डोंगरे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, भाजयुमो जिल्हा महामंत्री इमरान खान ,ज्येष्ठ नेते विजय वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष मोहित दांगोरे, भाजयुमो चे युवा कार्यकर्ते विस्मय बहादे, चैतन्य कोहळे, श्रीपाद भाकरे, अभय राजूरकर, निलेश नवघरे, देवानंद मारेकार, गजानन भोयर तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.