स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनामुळे नागरीकांनी मानले आयोजकांचे आभार
मूल (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुस्तकांच्या माध्यमातुन घरोघरी पोहचावे यासाठी मूल येथील मित्र मंडळी मिळुन ‘‘बाबासाहेब’’ या पुस्तकांचे वितरण 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्ताने करण्यात आले.
मूल येथील बस स्थानकाजवळील साई लॉजच्या समोर मित्र परिवारांच्या पुढाकारातुन ‘‘बाबासाहेब’’ या पुस्तकाच्या वितरण सोळल्याला उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उज्वलकुमार इंदुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरथ उराडे, मूल नगर पालीकचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, राकेश रत्नावार
माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंगलाताई आत्राम, मूल तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय पडोळे, माजी सचिव राजु गेडाम, मूल नगर पालीकेचे माजी नगरसेवक विनोद कामडी, अॅड. भडके, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुत्यालवार, भाजपा ओबीसी सेलचे नेते राकेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
मूल येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पोटवार, प्रदिप वाळके, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक भोजराज गोवर्धन, यांच्या पुढाकारातुन ‘‘बाबासाहेब’’ या पुस्तकोचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, पंकजकुमार संपादक असलेल्या ‘‘बाबासाहेब’’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (व्यक्ती आणि वाडमय) या पुस्तकोच्या सुमारे 200 कॉपी यावेळी वाटप करण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन मंगेश पोटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी दिपक घोंगडे, मनोज जांभुळे, गौरव शामकुळे, महेश चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.
यास्तुत्य उपक्रमाच्या आयोजनामुळे नागरीकांनी आयोजकांचे आभार मानले.






