राष्ट्र सेवा दल सामाजिक सलोखा सप्ताहानिमित्य विविध कार्यक्रमाचे संपन्न

मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील चांदापूर येथे राष्ट्रीय सेवा दलाच्या वतिने सामाजिक सलोखा सप्ताहाचे आयोजन नुकताच करण्यात आले होते.

कार्यकमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पंढपूर येथील .नवनाथ गेंड, शेगांवचे गजानन खोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच विनायकराव झरकर, माजी सरपंच खुशालराव शेरकी, माजी सरपंच बंडूजी मडावी, माजी सरपंच लताताई चिंचोलकर, ग्राम पंचायत सदस्य विनोद कोहपरे, ह.भ.प. जिवनदास पोटे महाराज, ह.भ.प. चरणदास पोटे महाराज, ह.भ.प. दिवाकर चिंचोलकर महाराज, संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय चांदापूरचे अध्यक्ष नवनित चिंचोलकर, राष्ट्र सेवा दल राज्य मंडळ सदस्य नंदकिशोर शेरकी, राष्ट्र सेवा दल चंद्रपूर जिल्हा सचिव विलास फलके, संघटक विजय मिटपल्लीवार उपस्थित होते

सदर कार्यक्रम राष्ट्र सेवा दलाचे विश्वस आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडला. पंढरपूर येथील विठ्ठल मंदीर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून साने गुरुजी यांनी २ मे 19४७ पासून सतत दहा दिवस आंदोलन केले .व सर्वांसाठी मंदीर खुले करून दिले या घटनेला ७५ वर्ष झाले त्यानिमित्य राष्ट्र सेवा दला तर्फे सामाजिक सलोखा सप्ताह साजरा केल्या जात असल्याचे नवनाथ गेंड यांनी सांगितले. त्यानंतर रामभरोसे भजन मंडळ चांदापूर यांनी वैष्णव जन ते या अभंगाचे सुरेल गायन केले .व खरा तो एकचि धर्म या प्रार्थनेचे गायन करून जगात प्रेम भावना असावी असा संदेश देण्यात आला .

कार्यक्रमासाठी चांदापूर येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे सर्व सदस्य, गुरूदेव सेवा मंडळाचे सदस्य, बहुसंख्य महिला व बालगोपालांनी सहभाग दर्शवला .