चंद्रपूर-मूल मार्गांवर ट्रॅकर आणि ट्रॅक मध्ये भीषण अपघात

अपघातात 2 चालकासह 7 मजुरांचा मृत्यू

मूल (प्रतिनिधी) : दोन ट्रक मध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही ट्रक जळून खाक झाल्याची घटना चंद्रपूर मूल मार्गांवर गुरुवारी रात्रौ 10.30 वाजता दरम्यान घडली.

चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे डिझेल घेऊन जाणाऱ्या ट्रँकर आणि लकडा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक मध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रॅक जळून खाक झाले. झालेल्या अपघातात 2 चालकासह 7 मजुरांचा होरपडून मृत्यु झाला. अपघात झाल्या नंतर सुमारे 1 तासांनी अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचुन आग विझविण्याचे कार्य करीत होते.

अपघातातील टँकर चालक हा अमरावती येथील हाफीज खान आणि वाहक वर्धा येथील संजय पाटील यांचा मृतात समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांचा अपघातात कोळसा झाला. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. तर  लाकूड भरलेल्या ट्रकमध्ये अजय डोंगरे, 30, बल्लारपूर,  प्रशांत नगराळे, 33, लावारी, नवी दहेली, मंगेश टिपले, 30, लावारी, नवी दहेली, भैय्यालाल परचाके, 24, लावारी, नवी दहेली,  बाळकृष्ण तेलंग, 57, लावारी, नवी दहेली, साईनाथ कोडाप, 40, लावारी, नवी दहेली, संदीप आत्राम, 22, कोठारी यांचा समावेश आहे.

सदर अपघातामुळे मूल-चंद्रपूर मार्गांवरील वाहतूक पूर्णपने बंद झालेली आणि केळझर मार्गांवरून वाहतूक सुरु करण्यात आली होती. अपघात नेमका कसा झाला याबाबत तपास सुरू आहे