जुनगाव येथील धक्कादायक घटना
दिलीप मॅकलवार, पोंभुर्णा
तालुक्यातील जुनगांव हे 9 ऑगष्ट पासुन वैनगंगा नदीच्या पुराने वेढले आहे, अजुनही पुराचे पाणी कमी न झाल्याने या पुरामध्ये कुमार मारूती दुधनवार या शेतकÚयांची बैलजोडी शुक्रवारी 12 ऑगष्ट रोजी पुरात वाहुन गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील टोकावर असलेल्या जुजगांव हे गांव अजुनही दुर्लक्षीत आहे. योग्य आरोग्य सेवा याठिकाणी नसल्याने उपचाराअभावी एका तरुणाचा १० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी कुमार मारुती दुधनवार या शेतकरÚयाचे दोन्ही बैल पुरामध्ये वाहून गेले आहे.
सदर घटनेमुळे शेतकÚयावर मोठे संकट कोसळले असून त्याला तात्काळ शासनाने मदत करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल पाल व शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे.