मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सुपुर्द
मूल (प्रतिनिधी): 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा शासन बंद करण्यासाठी परिपत्रक काढलेले आहे, यामुळे हजारो विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासुन दुर होण्याची शक्यता आहे यामुळे सदर शासन परिपत्रक शासनाने रद्द करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मुन्ना राव यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्यास गावखेडयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असुन त्यांचे भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता आहे, दुर्गम भागात राहणाऱ्या गोरगरीब, वंचित बहुजन शेतकऱ्यांची मुले कायमची शिक्षणापासुन दुर होवु शकतो, शिक्षण हक्क कायदानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकास मोफत व शक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतुद असताना केंद्र सरकारने पारीत केलेल्या कायद्याची पायमल्ली होत आहे. हया अमानुष निर्णयमुळे अनेक विद्यार्थी शाळाबाहय होवुन गळतीचे प्रमाण वाढेल, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल सोबत बालमजुरी, बालविवाह हया सामाजिक समस्या निर्माण होण्यास हा निर्णय कारणीभुत होणार आहे यामुळे शासनाने सदर निर्णय रद्द करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मुन्ना राव यांनी केले आहे.