नामदार मुनगंटीवाराच्या आगमनाची नागरीकांना उत्सुकता

मूल शहरात आगमन होत नसल्याने वेगवेगळया चर्चेला उत

मूल (प्रतिनिधी) : मूल शहराच्या सर्वांगिन विकासासाठी शासनाकडुन करोडो रूपयाचा निधी खेचुन आणत शहराचा विकास करणारे राज्याचे सांस्कृतिक कार्य, वनमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे मूल शहरात अजुनही आगमण झालेले नाही, यामुळे नागरीकांना नामदार मुनगंटीवार यांच्या आगमणाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिपदाची शपथ घेवुन जवळजवळ अडिच महिणे लोटुनही मूल शहरात नामदार मुनगंटीवाराचे आगमण न झाल्याने मूल तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यावर नाराज तर नाही ना अशी चर्चाही मूल तालुक्यात सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे (शिवसेना) आणि भाजपाची युती झाली, महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेे. आणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणुन नामदार एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणुन नामदार देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.. दरम्यान 9 ऑगष्ट रोजी क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेसह राज्यातील अनेक आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. जवळजवळ अडीच महिण्याचा कार्यकाळ लोटुन गेला. परंतु मूल तालुक्याचा ‘न भुतो न भविष्यती’,अशा विकास करणारे क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे अजुनही मूल शहरात न आल्याने नागरीकामधून नाराजीचा सूर ऐकायला येत आहे.

करोडो रूपयाचा निधी आणुन मूल तालुक्याचा कधी नव्हे तेवढा विकास नामदार मुनगंटीवार यांच्या कल्पनेतुन करण्यात आलेला आहे, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मूल तालुक्यातील विकास खुंटलेला होता मात्र शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे. तालुक्यात सिंचनाची भिषण समस्या काही प्रमाणात दुर करण्यासाठी नामदार मुनगंटीवार यांनी करोडाचा निधी खेचुन आणत अनेक सिंचनासाठी उपयोगी पडणारे विकासकामे करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मध्यंतरीच्या काळात निधी अभावी ठप्प पडलेले अनेक विकासकामे परत सुरू करण्यासाठी नामदार मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतलेला आहे, अनेक कामे सुरू सुध्दा झालेली आहे. परंतु कामाना वेग यावा यासाठी नामदार मुनगंटीवार यांचे मूल शहरात पदस्पर्श होणे गरजेचे आहे. नामदार मुनगंटीवार यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्हात अनेकदा आले, विकासकामे, सभा आणि अनेक संमारंभात उपस्थिती दर्शविली मात्र मूल शहरात अजुनही न नेण्यामागे काही नाराजी तर नाही ना अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे.