मूलच्या विद्यार्थ्यांनी कराटे स्पर्धेत केले राज्याचे नावलौकीक Karate competition

Naitik Dhobe, Yashsvi Yenugwar
Naitik Dhobe, Yashsvi Yenugwar

नैतिक धोेबे आणि यशस्वी येनुगवार यांना वेगवेगळे पदक प्राप्त

मूल (प्रतिनिधी): क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीड़ा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीड़ा स्पर्धेचे आयोजन धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुलात नुकतेच पार पडले. सदर स्पर्धेत मूलचे नैतिक धोेबे आणि यशस्वी येनुगवार याविद्यार्थ्यांनी रजत आणि कास्य पदक प्राप्त केले आहे. Naitik Dhobe, Yashsvi Yenugwar

ंसदर स्पर्धेमध्ये नागपुर, मुंबई, पुणे, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर हया आठ विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत मूल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सचा विद्यार्थी नैतिक चंदू धोबे ह्याने वय १७ वर्ष आतील मुले वयोगटात आणि ५४ ते ५८ ह्या वजनगटात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत रजत पदक पटकावले तर सेंट अँस हायस्कूलची विद्यार्थीनी यशस्वी संदीप येनुगवार हिने १४ वर्ष आतील मुली ह्या वयोगटात व ५० किलोग्रॅम आतील वजन गटात कांस्य पदक पटकावून मूल तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात नावलौकील केला आहे. Mul स्पर्धेच्या ठिकाणी क्लबचे कोच साहिल खान यांनी खेळाडूच्या पाठीशी योग्य भूमिका पार पाडली. Karate competition

नैतिक आणि यशस्वीच्या विजयावर जून्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख विनय बोधे, माउंट कॉन्वेंट स्कूल आणि सेंट अँस हायस्कूल, मूलच्या मुख्याध्यापिका, क्रीडा शिक्षक तथा अन्य शिक्षकवृंद आणि कराटे अँड फ़िटनेस क्लब मूल चे संचालक-प्रशिक्षक इम्रान ख़ान, निलेश गेडाम यांनी पदक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Nagpur, Mumbai, Pune, Amravati, Nashik, Kolhapur, Latur and Chhatrapati Sambhajinagar