मूल तालुक्यातील चिमढा येथील घटना
निनाद शेेंडे, मूल
स्लॉबवरील कोंबडया बघण्यासाठी जात असतांना पायऱ्यावरून पाय घसरून पडल्याने एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना मूल तालक्यातील चिमढा येथे घडली. अमीत अंबादास बोरूले वय 24 वर्षे असे मृतक युवकाचे नांव आहे. Amit Borule
मूल तालुक्यातील चिमढा येथील अमीत अंबादास बोरूले हा वडीलासोबत किराणा दुकान चालवित होता, त्यासोबतच घरीच कुकुटपालन व्यवसाय करीत होता, दरम्यान बुधवारी रात्रौ 11.30 वाजता कोंबडयांना चारा पाणी देण्यासाठी पायऱ्या चढत असताना पाय घसरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, कुटुंबियानी त्याला तात्काळ सावली येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. सावली ग्रामीण रूग्णालयात उत्तरीय तपासणी करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन केले. Chimdha
वडीलाचा व्यवसाय सांभाळुन शिक्षण घेत असलेल्या अमीतच्या दुर्देवी मृत्युने गावात शोककळा पसरला आहे. Rural hospital saoli