लक्की डिजीटल ग्राहक योजनेत 5 ग्राहकांना विशेष भेट वस्तु देवुन सन्मान Lucky Digital Customer Plan

Lucky Digital Customer Plan
Lucky Digital Customer Plan

विज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांची उपस्थिती

मूल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मूलच्या वतिने नियमीत ऑनलाईन विज बिल भरणाऱ्या  ग्राहकांसाठी ​लक्की डिजीटल ग्राहक योजना 2025 राबविण्यात आली होती, सदर योजनेतर्गत 5 लक्की विजेत्याची निवड करण्यात आली असुन त्यांना एका कार्यक्रमात भेट वस्तु देवुन सन्मानित करण्यात आले. Lucky Digital Customer Plan

Lucky Digital Customer Plan1
Lucky Digital Customer Plan1

यावेळी ​मूल येथील विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया, ​वरिष्ठ लिपीक आशिष बदखल, कनिष्ठ लिपीक गोडबोले, वरिष्ठ तंत्रज्ञ शेंडे उपस्थित होते. Chandan Choursiya

मूल तालुक्यात महावितरण विभागामार्फत 25 हजार 662 ग्राहक असुन घरघुती ग्राहक संख्या 20 हजार 921 आहे. उपविभागीय कार्यालय अंतर्गत ऑनलाईन विज बिल भरणाया ग्राहकांची संख्या 11 हजार 160 आहे.मूल तालुक्यातील जवळपास 50 टक्के ग्राहक हे ऑनलाईन बिल भरत आहेत. याग्राहकांमधुन लक्की डिजीटल ग्राहकांची सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रथम पुरस्कार यशोदिप नरेश चौधरी यांनी पटकाविला, यांना सामसंग कंपनीचे स्मार्ट फोन देवुन सन्मानित करण्यात आले. व्दितीय पुरस्काराचे मानकरी बंडु मुर्लीधर मोहुर्ले आणि गणेश श्रीहरी चिताडे यांना रेडमी कंपनीचे स्मार्ट फोन देवुन सन्मानित केले तर तृतिय क्रमांक स्नेहल अरून कोरडे, अनुजा राजु चिकाटे यांना स्मार्ट घडी देवुन सन्मानित करण्यात आले. MSEB

सदर लक्की ड्रा ग्राहक योजनेत मोठया संख्येने विज ग्राहकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया यांनी केले आहे. Mul