मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमांच्या निकालाची घोषणा
भोजराज गोवर्धन मूल
स्मार्ट सिटी म्हणुन ओेळख असलेल्या मूल येथील सार्वजनिक बांधकाम विभागला मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमातंर्गत नागपूर विभागातुन प्रथम पुरस्कार जाहिर झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेशकुमार टांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता राजेश चव्हाण आणि शाखा अभियंता व कर्मचाऱ्यानी केलेल्या उल्लेखनिय कार्यामुळे हा पुरस्कार मिळालेला आहे. Public Works Sub-Division Mul

राज्याचे माजी मंत्री तथा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक परिश्रमामुळे मूल तालुक्याच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर शासनाकडुन निधी खेचून आणुन तालुक्याच्या विकासकामे करून घेतले. मूल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात प्रभारी उपविभागीय अभियंता म्हणुन राजेश चव्हाण यांनी पदभार स्विकारले, यादरम्यान मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमांच्या निकालाची घोषणा करण्यात आली होती, नुकताच शंभर दिवशीय कार्यालयीन सुधारणांची विभागस्तरीय सर्वोकृष्ठ कामगिरीची यादी नुकतीच प्रसिध्द झाली. नागपूर विभागामध्ये वेगवेगळ्या कार्यालयांना प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यात मूल येथील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. Mukeshkumar Tangle
सदर पुरस्कारचे श्रेय सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेशकुमार टांगले आणि उपविभागीय अभियंता राजेश चव्हाण यांना जाते. कार्यकारी अभियंता मुकेशकुमार टांगले यांनी अतिशय नियोजनबध्दरित्या त्यांनी मूल तालुक्यातील विकासकामावर लक्ष देऊन बांधकामे करून घेतलेले आहे. त्यामुळेच सदर पुरस्कार मूल येथील उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मिळाला. व्दितीय क्रमांक कळमेश्वर बांधकाम विभाग तर कुरखेडा बांधकाम विभागास तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. Rajesh Chavhan
मूल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने विविध उल्लेखनीय आणि दर्जेदार बांधकामे केलेली आहे. देखण्या इमारती उभारल्या आहेत. त्यात मूल येथील विश्राम गृहाची इमारत विशेष उल्लेखनिय आहे, आठवडी बाजार ओटयाचे बांधकाम, प्रशासकीय भवन, चिरोली आणि मारोडा येथील पायलट बंधारा आणि ग्रामीण भागातील रस्ते तसेच इतर बांधकाम उल्लेखनिय आहेत. MLA Sudhir Mungantiwar