हळदी ग्रामपंचायतीमध्ये हेराफेरी Manipulation in Gram Panchayat

Manipulation in Gram Panchayat
Manipulation in Gram Panchayat

शासकीय निधीची लुट,गावक-यांची तक्रार

मूल (प्रतिनिधी) : येथील पंचायत समिती अंतर्गत असलेल्या हळदी गावगन्ना ग्रामपंचायतीमध्ये मोठया प्रमाणात आर्थिक हेराफेरी करण्यात आली. बोगस आणि नियमबाहय पदधतीने संगनमताने शासकीय निधीची लुट करण्यात आली. याबाबत गावक-यांनी थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आहे. ग्रामपंचायतचे संबधित ग्रामसेवक आणि संगणक परिचालक यांचे विरूदध निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. निःपक्ष चौकशी झाल्यास मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता गावक-यांनी व्यक्त केली आहे. Manipulation in Gram Panchayat

मूल तालुक्यातील मौजा हळदी गावगन्ना ग्रामपंचायत अंतर्गत घरकूल आणि पीक बुडीच्या संदर्भात हा घोटाळा झाला आहे. ग्रामपंचायत सदस्याची सासू श्रीमती कोठारे यांचे नावे घरकूल मंजूर झाला. मात्र, बांधकाम न करता ग्रामसेवकाने स्व मर्जीेने घर बांधकाम झाल्याचे दाखवून शासकीय निधीची उचल केल्याचे गावकरी रविंद्र चलाख यांनी यावेळी सांगितले. नियमांची पायमल्ली करून हा आर्थीक गैरव्यवहार झाल्याचे गावकरी म्हणतात. सन 2024 – 25 मध्ये पीक बुडी झाली. अवकाळी पावसामुळे हळदी गावगन्ना, हळदी तुकूम, वेडीरीठ, चक कवडपेठ शेतशिवारातील अवकाळी पावसामुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. यातही संगनमताने मदत निधी अहवाल तयार करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतक-यांना डावलून संगणक परिचालकाने जमिनीच्या दस्ताऐवजामध्ये हेराफेरी करून नातेवाईकांनाच लाभ मिळवून दिला. याबाबत संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी. शासकीय निधीची लुट करून ग्रामपंचायतीमध्ये मोठया प्रमाणात गैरव्यवहार करणा-या ग्रामपंचायतचे सचिव हिना रामटेके आणि संगणक परिचालक हेमंत भूरसे यांचे विरूदध निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावक-यांनी केली आहे. अन्यथा मूल पंचायत समिती जवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा गावक-यांनी दिला आहे. प्रकरणाचे बिंग फोडण्यासाठी हळदी येथील गावक-यांनी मूल मध्ये पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला रविंद्र चलाख, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनिल चलाख, जितेंद्र कोठारे, मोरेश्वर पिंपळे, जीवनदास चलाख उपस्थित होते. Haldi

हळदी गावगन्ना येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सचिव आणि संगणक परिचालकाने केलेल्या गैरव्यवहाराची तालुका प्रशासनाकडे तक्रार करून दीड महिण्याचा कालावधी लोटत आहे.तरीही संबधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही. शासकीय निधीची लुुट करणा-या भ्रष्टाचा-यांना प्रशासन पाठिशी घालत आहे. पालकमंत्र्यांकडे सुदधा तक्रार दाखल करण्यात आली आहे.आता थेट मुख्यमंत्र्यांना तक्रार दाखल करून कारवाईची मागणी संपूर्ण गावक-यांच्या वतीने करण्यात आली आहे. –
सुनिल चलाख
अध्यक्ष,
तंटामुक्ती समिती, हळदी गावगन्ना. Mul

यादी दुरूस्ती करून वरिष्ठांकडे पाठविली: ग्रामसेवक हिना रामटेके
तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक मिळुन यादी तयार करण्यात आली होती, यादी संगणिकृत करताना संगणक परिचालकाची चुक झाली, त्यामुळे यादी दुरूस्ती करून तहसील कार्यालयात पाठविली आहे. यामध्ये कोणत्याही पध्दतीची हेराफेरी झालेली नाही अशी प्रतिक्रीया हळदी ग्राम पंचायतच्या प्रभारी ग्रामसेवक हिना रामटेके यांनी दिली.