कोणतेही निकष न लावता नुकसान भरपाई द्या : नितीन येरोजवार compensation for damages

compensation for damages
compensation for damages

मूल (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले, पिक घरी नेण्याच्या आधीच अतिवृष्टीमुळे पिक जमीनदोस्त झाले, यामुळे घेतलेल कर्ज फेडण्याची चिंता शेतकÚयांना अधिकच सतावत आहे यामुळे शासनाने मूल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना कोणतेही निकष न लावता हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई व सातबारा कोरा करून संपुर्ण कर्जमाफी देण्याची मागणी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे संघटक नितीन येरोजवार यांनी केली आहे, त्याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या मार्फतीने शासनाकडे पाठविले आहे. compensation for damages

compensation for damages1
compensation for damages1

मुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण भात व कापूस पिकाचे प्रचंड नुकसान होऊन उभी शेती पाण्याखाली येऊन जमीनदोस्त झाली आली आहे. याप्राश्वभूमिवर बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे संघटन प्रमुख नितीन येरोजवार यांनी संपूर्ण तालुक्याच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली, शेतकरी बांधवाचे उभे पिक जमीनदोस्त झाले पिकाचे नुकसान होऊन हातात काही येण्याची चिन्हे दिसत नाही. गेल्या काही दिवसात प्रचंड प्रमाणात पाऊस आल्यामुळे सर्व पिक उध्वस्त झाले आहे. धानाच्या सरडया पुर्णपणे पाण्याखाली आलेले आहे यामुळेे शिवसेना बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार यांची नेतृत्वात मुल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. Nitin Yerojwar 

अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाचे पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यांच्या हातात आलेला घास हिरावला गेला त्यामुळे धान,कापूस उत्पादक शेतकरी बांधवाना सरसकट कोणतेही निकष न लावता नुकसान 50 हजार रुपये हेक्टरी भरपाई द्यावी व सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राज ठाकरे, शहर प्रमुख बादल करपे, उपतालुकाप्रमुख रवी शेरकी, सुशीचे सरपंच अनिल सोनुले, उपतालुकाप्रमुख संदीप निकुरे, माजी तालुका प्रमुख सुनील काळे, महेश चौधरी, तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले, दिशांत पुण्यापवार यांचेसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. Shivsena