नगर परिषदेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा : माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार Mul Municipal Council

Mul Municipal Council1
Mul Municipal Council1

माजी सभापती प्रशांत समर्थसह शेकडो कार्यकर्तांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मूल (प्रतिनिधी) : मूल शहरातील नागरीकांना 24 तास स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासोबतच विकासाचे आमीष दाखवुन मूल नगर पालीकेवर सत्ता स्थापन करणाऱ्याना भाजपाला दुर करून होवु घातलेल्या मूल नगर पालीकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी  कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले, मूल तालुका व शहर कॉंग्रेस कमेटीच्या वतिने मूल येथील मॉ दुर्गा मंदिराच्या सभागृहात आयोजीत केलेल्या कॉग्रेस कार्यकर्ता मेळाव्या ते बोलत होते. यावेळी मूल नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. Election#Vijay Wadettiwar

Mul Municipal Council2
Mul Municipal Council2

मूल नगर पालीकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आयोजीत केलेल्या कार्यकर्ता मेळावाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस संतोषसिंह  रावत होते, प्रमुख अतिथी म्हणुन माजी आमदार देवराव भांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, महिला कॉंग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, मूल नगर पालीकेचे माजी अध्यक्ष विजय चिमडयालवार, मूल पंचायत समितीच्या माजी सभापती वैशालीताई पुल्लावार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगला आत्राम, कॉंग्रेसच्या महिला तालुका रूपाली संतोषवार उपस्थित होते. Mul#Chandrapur

Mul Municipal Council3
Mul Municipal Council3

कॉंग्रेस पक्षात आता इनकमींग सुरू झालेली आहे, प्रशांत समर्थ यांनी पहिला नंबर लावुन टाकला, त्यांनी घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे, प्रशांतराव आता तुम्ही बिनधास्त तयारी करा, काही चिंता करण्याची गरज नाही, यावेळी नगर पालीकेवर कॉंग्रेसचाच झेंडा फडकेल असा विश्वास आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. Santosh Rawat

Mul Municipal Council4
Mul Municipal Council4

यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस संतोषसिंह  रावत, माजी आमदार देवराव भांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मूल नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा दरार दुर्गा मंडळाचे संस्थापक प्रशांत समर्थ, दरार महिला मंडळाच्या अध्यक्ष एकता समर्थ, भाजपा कार्यकर्ते राहुल येनप्रेड्डीवार, संतोष ठाकुरवार, रितीक गोयल, स्वप्नील श्रीरामे, प्रविण खानोरकर, सुनिल महाडोळे, दिनेश लेनगुरे, धर्मा चौधरी, सोनी ठाकुरवार, प्रणाली येनप्रेड्डीवार, संगीता मोहुर्ले, मनिषा ठाकुरवार, आकाश इन्नमवार, गौरव बावणकर, अरविंद पोहणे यांचेसह दिडशेच्या वर भाजपा व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ, विजय वडेड्डीवार यांचे उपस्थितीत स्थानिक कॉंग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. Prashat Samarth

सभेचे प्रास्ताविक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी केले, संचालन शहराध्यक्ष सुनिल शेरकी यांनी केले तर उपस्थितांचे आभार महीला अध्यक्ष नलीनी आडपवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.