प्रभाग 9 मधुन संजय येरोजवार यांची प्रबळ दावेदारी Sanjay Yerojwar

Sanjay Yerojwar
Sanjay Yerojwar

मूल (प्रतिनिधी) : 2 डिसेंबर रोजी होवु घातलेल्या मूल नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडुन प्रा. संजय येरोजवार यांची प्रबळ दावेदारी समजली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासुन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन विविध समाजोपयोगी कार्य त्यांच्या माध्यमातुन होत असल्याने भारतीय जनता पार्टी त्यांनाच उमेदवारी जाहिर करतील असा विश्वास प्रभागातील मतदारांना आहे. BJP

मूल नगर परिषदेची निवडुण येत्या 2 डिसेंबर रोजी होवु घातलेली आहे. प्रभाग क्रं. 9 येथील अ गट हे अनुसुचित जाती महिला करीता राखीव आहे. तर ब गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे, याठिकाणी भारतीय जनता पार्टीकडुन ब गटासाठी 9 इच्छुकांनी अर्ज भरलेला आहे. याप्रभागात स्थानिक इच्छुक भरपूर असतांनाही प्रभागाबाहेरचे कार्यकर्तेही याप्रभागातुन निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे स्थानिक इच्छुक कार्यकर्त्यांनी स्थानिक मतदारांनाच उमेदवारी दयावी अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केल्याची विश्वसनिय माहित आहे. Ward No. 9

अनुसुचित जातीचे मतदार मोठया प्रमाणावर असलेल्या प्रभाग क्रं. 9 मध्ये एकुण मतदार 2601 आहे. त्यापैकी अनुसुचित जातीचे मतदार 865 आहेत तर 381 मतदार हे अनुसुचित जमातीचे आहेत. याप्रभागातुन प्रा. संजय येरोजवार यांनी 2005 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन निवडणुक लढविली होती, त्यावेळी त्यांचा काही मोजक्याच मतानी पराभव झाला, मात्र त्यांनी सामाजिक कार्याची ओढ कमी होवु दिली नाही, त्यांनी 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देवुन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केले. आज ते भाजपाचे मूल शहर उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत, त्यांच्या मागे मोठा जनाधार असल्याने त्यांची प्रभाग क्रं. 9 साठी प्रबळ दावेदारी मानली जात आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी जाहिर केल्यास ते मूल नगर परिषदेत नगरसेवक म्हणुन निश्चीत निवडुन जातील असा विश्वास प्रभागातील काही मतदारांनी व्यक्त केला आहे.