उमेदवारी वाटपावरून भाजपात नाराजी युध्द Election

Mul Municipal Council
Mul Municipal Council

कुणबी समाजाला 30 टक्के प्रतिनिधीत्व देण्याची तयारी

मूल (प्रतिनिधी) : येत्या 2 डिसेंबर रोजी मूल नगर पालीकेची निवडणुक होत आहे, यासाठी सर्वच पक्ष उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत, मात्र भाजपाकडे नगरसेवक पदाच्या 20 जागेसाठी 112 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेला होता, त्यापैकी 30 टक्के प्रतिनिधीत्व एका कुणबी समाजाला देण्याचा प्रयत्न भाजपा पक्षश्रेष्ठी कडुन होत असल्यानेे इतर समाजामध्ये तिव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे. BJP

भारतीय जनता पार्टीने मूल नगर पालीकेची निवडणुक बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी मत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवित आहेत. 27 नोव्हेंबर 2016 रोजी पार पडलेल्या मूल नगर पालीकेची निवडणुकही माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनखाली लढविण्यात आली होती, त्यावेळी भाजपाच्या उमेदवार प्रा. रत्नमाला भोयर या थेट जनतेतुन नगराध्यक्ष म्हणुन निवडुण आल्या होत्या, त्यासोबतच 16 नगरसेवक भाजपाचे निवडुण आले, केवळ एका जागेवर कॉंग्रेस पक्षाला समाधान मानावे लागले होते. यंदा होणाऱ्या  मूल नगर पालीेकेच्या निवडणुकीत भाजपाने जवळपास निश्चीत केलेल्या उमेदवारपैकी 30 टक्के उमेदवार हे कुणबी समाजाचे आहेत, 15 टक्के माळी समाजाचे तर आरक्षणानुसार अनुसुचित जातीचे उमेदवार 15 टक्के आणि अनुसुचित जमातीचे उमेदवार 10 टक्के उभे करण्याच्या तयारीत भाजपा आहेत. त्याखालोखाल केवळ 5 टक्के असलेल्या समाजामध्ये तेली, पंचाळ, कलार, कोमटी आणि भोई समाजाचा नंबर लागतो, यामुळे इतर समाजाचे कार्यकर्त्यांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे. 30 टक्के उमेदवार केवळ कुणबी समाजाचे का? असा प्रश्नही यानिमीत्याने भाजपा कार्यकर्ते चर्चा करीत आहेत. Mul Municipal Council

भाजपाच्या 7 माजी नगरसेवकांना होवु घातलेल्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी दिलेली आहे, यातील काही माजी नगरसेवकांनाबद्दल मतदारांमध्ये तिव्र नाराजी आहे, याचा फटका भाजपाला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एका प्रभागात तर दोन्ही गटातुन कुणबी समाजाचे उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत, मूल नगर पालीकेत याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. Election