भूखंड माफिया सक्रीय झाल्याने जमिनीचे भाव वधारले

एकच प्लॉट अनेक ग्राहकांना विकण्याचे सत्र सुरू
मूल (प्रतिनिधी) : शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने जमिनीवर भूखंड आखण्याचे प्रमाण दिवसांगणित वाढलेले आहेत. यातील भूखंडांची परस्पर विक्री करून एकाच प्लॉटची एकापेक्षा अधिक ग्राहकांना विक्री करून लाखो रुपयांनी गंडविणारी दलालांची टोळीही सक्रिय झाली आहे.
          मूल तालुका हा चंद्रपूर जिल्हयाच्या मध्यभागी आहे, याठिकाणी 10 वर्षांपूर्वी कमी दराने प्लॉटची खरेदी विक्री केली जात होती, परंतु तालुक्यात गेल्या काही वर्शापासून दलालांची संख्या झपाटयाने वाढल्याने आजच्या स्थितीत शेकडोच्या वर दलाल मूल शहरात सक्रिय झाले आहे. एकच प्लॉट अनेकांना विक्री करण्याचा त्यांचा धंदा असल्याने एक दोन वर्षात एकच प्लॉटची किंमत 4 ते 5 पट किमतीने विक्री केली जात आहे. मूल षहरात एलो बेल्ट जमीनी खुपच कमी आहेत, परंतु एलो बेल्टच्या बाजुला असलेल्या ग्रिन बेल्ट जागेवर प्लॉट टाकण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत, त्याठिकाणी साधा लेआऊट टाकुन प्लॉट विक्री करण्याचा प्रकारही त्यांच्याकडुन केला जात आहे. मूल षहरातील सरकारी जागेचीही विक्री यादलालमार्फत होत असल्याने आष्चर्च व्यक्त केल्या जात आहे.
          मूल तालुक्यात प्लॉट प्रमाणेच शेती विक्री करताना पलटी मारण्याचे प्रमाणे दलालाकडुन वाढल्याने, षेतीच्या किंमतीमध्येही भरमसाठ वाढ झालेली आहे, अशा खरेदी-विक्री व्यवहार करताना खरेदी-विक्री कार्यालयातील कर्मचारी यासह अन्य दलालही सहकार्य करीत असल्याची चर्चा आहे, असा दलालांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here