घरात घुसले पाणी सामानाची नासधूस कुटुंब रस्त्यावर Water entered the house

Water entered the house
Water entered the house

जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करुन नुकसान भरपाई द्यावी-संतोषसिंह रावत

संगीता गेडाम, मूल : मागील तीन दिवसपासुन सततधार सुरू असलेल्या पाऊसामुळे Mul मुल शहरामधील बराचशा भाग पाण्याखाली येऊंन, पूरसदृश परिस्थिती तयार होऊन शहरातील जवळपास अनेक घरांमध्ये पाणी घुसले व मोठे नुकसान शहरवासियांना सहन करावे लागत आहे. Water entered the house, the family’s belongings were destroyed, the family was on the street

मूल शहरातील जनतेला व विशेषता वॉर्ड क्रमांक १५, १६, १७ मधील नगरवासियांना दरवर्षीच्या पावसात असा सामना करण्याची वेळच येत असल्याने प्रशासन विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे. याबाबत वॉर्डातील नागरिकांनी न.प. व बांधकाम विभागाला सूचना केल्या परंतु याबाबत प्रशासनाने पाण्याचा निचरा होण्यासाठी काहीही नियोजन केलेले नाही. दुर्गा मंदिर परिसरातील तलावाच्या मागील भागात डी.पी.रोड लगत वास्तव्यात असणारे वॉर्ड नंबर १६ मधील रवींद्र उराडे, वर्षा रामटेके, रायपुरे, ललिता मेश्राम,शुभम अवतरे, काजल दुधे,सीमा भसारकर, तर दुर्गा मंदिर समोरील भागात राहणारे प्रफुल म्याकलवार, अमित मंकिवार, रामदास गुरनुले,बंडू चौधरी, अनिल कोठारे,सोनू नान्हे,प्रकाश भोयर, लक्ष्मण क्षिर्गिर्वार यांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील सामान ओले झाले,नासधूस झाली. घरातील पाणी बाल्ट्याने झोकून देण्याची पाळी आली. Mul City

मुल शहरातून जाणाऱ्या महामार्गावर तिन ते चार ठिकाणी महामार्ग फोडून मोठया व्यासाचे पाईप टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु तेही काम केल्या गेले नाही म्हणून ही परिस्थिती नागरिकांवर आली असल्याचे नागरिक बोलून दाखवीत होते. मागील तीन वर्षापूर्वी शहरातील वॉर्ड न.१५, १६, १७ मध्ये मुसळधार पावसातही काही घरांमध्ये पाणी घुसले होते. अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

न.प. व बांधकाम विभागाने पाण्याचा निचरा होणारी आऊट लाईन केली नाही व पाण्याचा लोंढा सारखा क्षमतेपेक्षा अधिक वाहणारे पाणी दोनदा अनेक घरांमध्ये घुसले आहे. ही परिस्थिती शासनाने व प्रशासनाने त्वरित

santoshsinh rawat
santoshsinh rawat

सुधारावे यासाठी काही उपाय योजना कराव्या आणि नागरिकांच्या घरात पाणी घुसले याचीही नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचेे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे. Santoshsinh Rawat