दररोज नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा; नगरसेवक अजय सरकार यांचे मनपा आयुक्तांना निवेदन

 

चंद्रपूर शहरात एकदिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असते. दररोज नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी बंगाली कॅम्पचे नगरसेवक अजय सरकार यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी ९ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेऊन निवेदन दिले.
चंद्रपूर शहराची पाणी समस्या पाहता चंद्रपूर शहरातील जनतेला महानगरपालिकेकडून एका दिवसाआड एक पाणी दिले जात आहे. मात्र पाण्याचे बिल पूर्ण भरावे लागते. याबाबत आयुक्तांशी चर्चा झाली. चंद्रपूर शहरातील जनतेला वर्षभर नियमित पाणी देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.