पोंभुर्णा येथील 14 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपींची संख्या वाढणार?

पोंभुर्णा (प्रतिनिधी)    चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बहुल, मागास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यात मागील काही दिवसापूर्वी एका 14 वर्षीय मुलीवर तिच्या भीत्रेपनाचा व मजबुरीचा फायदा घेऊन तिला धमकावून तिचे शारीरिक शोषण व तीचेवर अत्याचार अनेकजणांनी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसात तक्रार झाली,त्यावरून तीन आरोपी विरोधात 376, पॉस्को व अट्रसिटि अक्ट अंतर्गत करवाई झाली, परंतु पकडकेले केवळ तीनच आरोपी त्या प्रकरणात नसून अनेक आरोपी असल्याची बाब चर्चेतून समोर येत आहे. दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांकडे या संदर्भात काही पुरावे असून विडिओ व ऑडियो असल्याचे पण समजते यावरून हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करून सगळ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी ऑल इंडिया पैँथर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रूपेश निमसरकर यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

खरं तर पोंभुर्णा तालुक्यात एवढी मोठी निंदनीय घटना घडून सुद्धा या परिसरातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्याकडून दखल घेतली गेली नाही याचे आश्चर्य असून पीडित मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याची बाब सुद्धा समोर येत असल्याची चर्चा समाजमन सुन्न करणारी आहे.त्यामुळे जिल्ह्यातील महिला संघटना नेमक्या कुठल्या बिळात लपल्याय हेच कळायला मार्ग नसून पिडितेचे आई वडील व नातेवाईक मोठ्या चिंतेत आहे.