दे धक्काच्या माध्यमातुन जनतेचे प्रश्न सुटावे : सौ. सध्याताई गुरनुले

दे धक्का एक्सप्रेसच्या शुभारंभ सोहळयात उद्गगार

मूल : जिल्हयात अनेक प्रश्न अजुनही कायम आहेत, त्यासोडविण्याच्या दृष्टीने पोर्टलच्या माध्यमातुन सविस्तर बातम्या येणे अपेक्षीत आहेत, यामुळेच समाजातील शेवटच्या घटकाना न्याय मिळु शकतो, ते काम दे धक्काच्या माध्यमातुन पुर्ण व्हावे असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी व्यक्त केले. त्या दे धक्का एक्सप्रेसच्या शुभारंभ सोहळयात    अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
स्थानिक पंडीत दिन दयाल इको पार्क येथे आयोजीत शुभारंभ सोहळयाला उद्घाटक म्हणुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत होते, प्रमुख अतिथी म्हणुन मूल नगर पालीकेच्या अध्यक्षा प्राचार्य रत्नमाला भोयर, साम मराठी वृत्तवाहिणीचे चंद्रपूर/गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी संजय तुमराम, दै. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे, नागपूर हायकोर्टाचे अधिवक्ता कल्याणकुमार, डिजीटल मिडीया असोसिएशनचे कार्याध्यक्ष विजय सिध्दावार, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे दे धक्का एक्सप्रेसमध्ये अन्यायाविरूध्द धमाकेबाज बातम्या येणे गरजेचे आहे, यामुळेच जनतेचे प्रश्न सुटतात, दे धक्का एक्सप्रेसच्या मध्यमातुन संपादक मंडळानी चांगली सुरूवात केल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आणि भविष्यात दे धक्काच्या माध्यमातुन चांगले कार्य घडुन येवो अशा शुभेच्छा दिल्या.
समाजाला आमच्याकडुन प्रचंड अपेक्षा आहेत, परंतु समाज आमच्या पाठीशी राहात नाही, एखादी बातमी कोणाच्या विरोधात प्रकाशीत झाली, तर तो पत्रकार बदमास आहे, परंतु खरी बातमी लिहीण्याची हिम्मत पत्रकारांची होणार कधी, आपण दे धक्का एक्सप्रेस पोर्टल सुरू केले, यामधुन खऱ्या बातम्या दया, यासाठी आपल्याला शुभेच्छा मात्र आपण गर्दीचे भाग बनु नका अशी अपेक्षा दे सकाळचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर, साम मराठीचे जिल्हा प्रतिनिधी संजय तुमराम, नागपूर हायकोर्टाचे अधिवक्ता कल्याणकुमार, डिजीटल मिडीया असोसिएशनचे कार्याध्यक्ष विजय सिध्दावार, मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी चित्रपट प्रक्षेपण यंत्राच्या माध्यमातुन दे धक्का एक्सप्रेस यावेब पोर्टलचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संपादक मंगेश पोटवार यांनी केले. संचालन संपादक धनराज रामटेके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गौरव शामकुळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.