मेस्टाच्या नागपूर विभाग उपाध्यक्षपदी अनिल मोगरे

मूल :  शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोशिएशनच्या नागपूर विभाग उपाध्यक्षपदी मूल येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे अनिल दादाजी मोगरे यांची संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.
वेळ, श्रम, बुध्दी, पैसा, कौशल्य हे पंचदान महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोशिएशन या वैचारीक चळवळीत मूल येथील अनिल दादाजी मोगरे यांनी दिलेले आहे. त्यासोबतच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याने, संघटनेचे कार्य बळकट करण्याच्या दुष्टीने त्यांच्याकडे नागपूर विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल संघटनेचे पदाधिकारी आनंद कवाडे, मनीष तिवारी, प्रज्ञा बोरंगमवार, श्रीमती जीवतोडे, प्रा. संजय येरोजवार, प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, निलेश रॉय, प्रदीप वाळके यांनी अभिनंदन केले