नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून लाखो रूपये महिणा कमविणारा ‘तो’ गुरूजी कोण ?

  1. तालुक्यात चर्चेचा विषय !

मंगेश पोटवार, मूल
झटपट श्रीमत होण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगचे काम करण्यात आता शासकीय कर्मचारीही मागे नाही, मूल तालुक्यातील एका शाळेतील गुरूजी नेटवर्क मार्केटिंगच्या व्यवसायात चांगलेच गुंतलेले असुन ‘तो’ महिण्याला लाखो रूपये कमवित असल्याने, त्याचे शिक्षण क्षेत्रात होत असलेले दुर्लक्ष पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत असुन सदर गुरूजीच्या नेटवर्क मार्केटिंगची चर्चा मूल तालुक्यात चांगलीच चर्चींली जात आहे.
प्रत्येकच व्यक्तीला झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न असते, ऐशो आरामातीत जिवन जगण्यासाठी नागरीक जिवनात अनेक परिश्रम करीत असते, परंतु ज्याव्यक्तीला शासकीय नौकरी आहे, त्यानेही नौकरी व्यतिरीक्त नेटवर्क मार्केटींगचे काम करून शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करावे यापेक्षा दुर्देव्य काय असु शकते, मात्र मूल तालुक्यातील एका गावात असा प्रकार घडत आहे,  एका शाळेतील गुरुजी नेटवर्क मार्केटिंगचे काम करून लाखो रूपये महिणा कमवित असल्याचे बोलले जात आहे. सोबत संबंधित गुरूजीच्या विदेशवारीची चर्चा जनतेकडून मोठया चवीने ऐकल्या जात आहे. अशा शिक्षकामुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होवून प्रामाणिक शिक्षकाना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत मूल येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यागुरूजीची शिक्षण विभागासोबतच शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे समजते.