अयोध्या दर्शन करून आलेल्या रामभक्तांकडुन मूल येथे महाप्रसादाचे वाटप

मूल : प्रभु रामचंद्रावर श्रध्दा असलेल्या मूल तालुक्यातील 27 युवकांनी नुकतेच अयोध्या येथे जावुन दर्शन करून आले, यानिमीत्याने मूल येथील गांधी चौकात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामहाप्रसादाचा नागरीकंनी लाभ घेतला.
मुल शहरातील 27 युवक प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला अयोध्येला गेले होते., न्यायालयाच्या निकालानंतर प्रभू श्रीराम मंदिर बांधकामाला प्रत्यक्षात सुरवात झालेली आहे, अनेक दशकांपासून धार्मिक अस्मिता ठेवून असलेल्या जनतेत न्यायालयाच्या निकालानंतर नवचौतन्य आलेले असून अनेक गावांमधून नागरिक अयोध्येचे दर्शन घ्यायला जात आहेत, मुल येथील युवकानी राम मंदिर दर्शनाला जाऊन आल्यानंतर मुल नगर वासीयांसाठी महाप्रसाद वाटपाचा (मावंदी) कार्यक्रम स्थानिक गांधी चौक येथे आयोजीत केला होता. आयोद्धेवरून आणलेला प्रसाद महाप्रसादात मिश्रित करत सदर प्रसाद हा संपूर्ण जनतेला वाटप करन्यात आले, प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात, संगीतबद्ध वातावरणात प्रसादाचे वाटप करण्यात आले, शहरवासीयांच्या दर्शनासाठी प्रभू श्रीराम, महादेव शंकर आणि प्रभू दत्ताच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या, शहरातील हजारो नागरिकांनी प्रतिमीचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला, रामभक्त भाजप शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, मूल नगर पालीकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ , प्रकाश गददेवार, प्रफुल संगीडवार, मधुकर बोरकर,, माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक प्रशांत लाडवे, विलास कागदेलवार, बाळा कावळे, रुपेश मारकवार, किशोर कापगते, राहुल प्रेमलवार, राकेश ठाकरे, अॅड. बल्लू नागोसे, रिंकू मांदाडे, अजय चावला, संतोष पालादुरकर, राहुल एनप्रेड्डीवार, ईश्वर लोनबले, रुपेश निकोडे, व श्रीराम भक्तांनी कार्यक्रमाच्या यशवितेसाठी विशेष प्रयत्न केले,