घरफोडी करणारे दोन आरोपी अटकेत मुद्देमाल जप्त

भद्रावती पोलिसांची कारवाई

अतुल कोल्हे (भद्रावती)  : शहरातील फुकट नगर येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या घरफोडीचे दोन आरोपींना भद्रावती पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई बुधवार ला करण्यात आली.
रुपेश उर्फ हनीसिंग भैयाजी किनाके वय 24 ,शंकर हरिदास परचाके वय 24 दोन्ही राहणार फुकट नगर असे आरोपीचे नाव आहे यातील दोन्ही आरोपींनी 13 ऑक्‍टोबरला रंजना गुजरकर रा. फुकट नगर हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकतीस हजाराचा मुद्देमाल केला होता या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात दाखल झाल्याने ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तूळजेवार, जगदीश झाडे, विश्वनाथ चौधरी, यांनी ही कारवाई केली.