शिंदे विद्यालयात ‘राष्ट्रीय गणित’ दिन साजरा

अतुल कोल्हे (भद्रावती)

भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय , चिचोंडी येथे थोर गणित तज्ञ रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त शासन परिपत्रक प्रमाणे ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी गणित मेळावा , गणितांचे विविध मॉडेल्स, गणितीय रांगोळी स्पर्धा, गणित प्रश्नमंजुषा इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण व्हावी, त्यांची गणिता विषयीची अनामिक भीती दूर व्हावी, भविष्यातील दैनंदिन जीवनातील गणित विषयाचे महत्त्व ह्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल महत्त्व मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे व गणित प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी केले. कु. सानिया पेंदाम, कु. उताणे, मानसी पिंपळकर, सचिन देठे , कु. कोमल आखाडे, सृष्टी कौरासे , साहेबा शेख, पायल तोडासे, प्राची तांदूळकर, चैताली सोनुलकर, साहिली दाते , इत्यादी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला .

कार्यक्रमाचे संचालन सुनिल देशमुख  तर  उपस्थितांचे आभार उमेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांनी सहकार्य केले.