पदावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार करु नये : सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी.एम. गावंडे

जिल्हा परीषद शाळेत ‘उत्सव मैत्रीचा’ स्नेहमिलन सोहळा संपन्न 
अतुल कोल्हे भद्रावती
विद्यार्थ्यांनी शाळेत शिकून मोठे झाल्यावर, विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असतांना भ्रष्टाचार करु नये. प्रामाणिकपने, शिस्तीने आपले आयुष्य जगावे, असे प्रतिपादन स्थानिक जिल्हा परीषद शाळेचे माजी मुख्याध्यापक जी.एम. गावंडे यांनी केले.
स्थानिक जिल्हा परीषद शाळा येथे सत्र १९९६ मधे दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षी त्यांच्या बैचला २५ वर्षे पुर्ण होत असल्यानिमित्ताने ‘उत्सव मैत्रीचा’ हा स्नेहमिलन सोहळा शाळेच्या परीसरात नुकताच आयोजित  केला.
यावेळी व्यासपिठावार स्नेहमिलन सोहळ्याचे अध्यक्ष विदयमान मुख्याध्यापक मोडक सर, विशेष अतिथी माजी मुख्याध्यापक गावंडे सर, प्रमुख अतिथी पवार सर, हजारे सर, सावरकर सर, भोयर सर, गोवर्धन सर, धांडे सर, किटे मॅडम, भालेराव मॅडम, संगीडवार मॅडम आदी उपस्थित होते.
यानिमित्ताने शाळेतील माजी शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला साउंड सिस्टीम यंत्र भेट देण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर विद्यार्थ्यांनीही मनोगतांमधून शाळा व शिक्षकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रध्दांजली देण्यात आली.
यावेळी सर्वच शिक्षक व विद्यार्थी भावूक झाले होते. सोहळ्याला माजी विद्यार्थ्यांमधे डॉ. मनोज हक्के, महेंद्र हक्के, मुन्ना बांबोळे, रविकांत वरारकर, अभय टोंगे, विजय इन्गोले, महेंद्र माणुसमारे, आशिष मडावी, अनुप पाटील, सतीश जुनघरे, संदिप पाचभाई, सुरेंद्र हनुमंते, विश्वास ताकसांडे, कुंदन नांदेकर, सुधीर चौधरी, विवेक चन्ने, रूचिका बोढे-बेलेकर, निलेश बांदुरकर, सतिश पिदुरकर, वैशाली महाकारकर, नम्रता धानोरकर, विना हेपट, उज्वला उमाटे, सीमा झाडे, रेखा ठेपाले, अर्चना मत्ते, शितल खोब्रागडे, प्रतिभा खानोरकर, वंदना दिवसे, अर्चना तिडके, अश्विनी शेंडे, उर्मिला पिदुरकर, तारा खडसे, जितू साखरकर, किरन वनकर, महेश कांबडे, कीर्ती घोंनमोडे, उमेश कांबडे, दिनेश वंजारी, भीमराव शिवगडे, गणेष नागपुरे, किर्ती पांडे, विजय लांडे, मनिषा जिवतोडे, राजु उके, दिनकर बेलेकर, गणेश पेंदरे, अमोल खोब्रागडे, जगदिश पढाल, कमलेश कदम, रंजना उमरे, संदीप ढेंगळे, प्रविण सरोदे, मनोज वैद्य, प्रशांत टिपले, राखी सहारे, मनोज काले, सपना रोडे, सारीका डांगे, संजय शेंडे, वैशाली कोल्हे मंथनकर, सुहास गोगुलवार, घनशाम गोहोकर, वर्षा कोल्हे, रवि रामटेके, मनोज मोडक, आदी अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. मनोज हक्के, संचालन प्रा. रविकांत वरारकर, वैशाली महाकारकर तर आभार नम्रता धानोरकर यांनी मानले. अत्यंत भावुक वातावरणात कार्यक्रम पार पडला.