नदीच्या पुलावरून पडून रानगवा ठार

वैनगंगा नदीवरील घटना


सावली : चंदपूर-गडचिरोली मार्गांवरील वैनगंगा नदीच्या पुलावरून जात असताना अचानक रानगव्याचा तोल जाऊन पडल्याने तो जागीच ठार झाले. सदर घटना शनिवारच्या पहाटे 3.30 वाजता दरम्यान घडली.

सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या व्याहाड क्षेत्रात मोठया प्रमाणावर वन्यप्राण्याचा वावर आहे. शनिवारी रानगव्याचा कळप वैनगंगा नदीच्या पुलावरून जात असताना 8 वर्ष वयाचा नर जातीचा रानगवा पुलाच्या खाली पडला. सदर रानगव्याला मोठी दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. याबाबत नागरिकांनी वनविभागाला माहिती देताच सावलीचे वनपरीक्षेत्राचे वनपरीक्षेत्राधिकारी वसंतराव कामडी, क्षेत्रसहाय्यक आर एम सूर्यवंशी यांनी भेट देऊन पंचनामा केला. सदर रानगव्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ पोचमपल्लीवार यांनी शवविच्छेदन केले. रानगव्याला वनविभागानी वैनगंगा नदीमध्ये  पुरविले.

घटनास्थळाला वनविभागाचे विभागीय वनाधिकारी खाडे, सहाय्यक वनसंरक्षक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली.