मका उत्पादक शेतकरी हरीदास ठाकुर यांच्या हस्ते शुभारंभ
मूल (प्रतिनिधी): तालूक्यातील शेतकऱ्यांचे उत्पादीत मका खरेदी करण्यांचा शुभारंभ बुधवारी दुपारी 4 वाजता दरम्यान शासकीय धान्य गोडाऊन मूल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांचे उपस्थितीत व राजगड येथील मका उत्पादक शेतकरी हरिदास ठाकूर यांचे हस्ते काट्टा पुजन करण्यांत आले. Maize Procurement
मका खरेदी शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे संचालक अमोल बच्चुवार, तुलाराम घोगरे, सुमित आरेकर, जालिंद्र बांगरे, चंदा कामडी, शेतकरी किरण पोरीवार, अडत्ये रामकुमार चिताई, अशोक डंबारे, दादाजी येरणे, प्रविण रोहणकर, रेवनाथ घोडमारे, बालू दिकोडवार, किशोर झाडे उपस्थित होते. APMC Mul
चंद्रपूर जिल्हा मार्केटींग अधिकारी यांचे मार्फतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे शासकीय आधारभूत दराने मका खरेदी करिता मंजूरी मिळाली असून शेतकÚयांनी मका खरेदीसाठी 105 शेतकÚयांनी ऑनलाईन मका खरेदी करिता नोंदणी केली आहे. मात्र मका खरेदी हि शासकीय धान्य गोडाऊन मध्ये करण्यांची अट असल्यामुळे शासकीय धान्य गोडाऊन मका खरेदी करिता उपलब्ध झालेले नव्हते. दरम्यान बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार व संचालकांनी तहसीलदार मोरे यांना निवेदन देवुन तालुक्यात मका खरेदी करण्याकरिता गोडाऊन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानुसार तहसिलदार मूल यांनी मका खरेदी करिता शासकीय धान्य गोडाऊन उपलब्ध करून दिलेला आहे. Rakesh Ratnawar
मका उत्पादक यांना विक्री करिता दिलासा मिळाला असून मका उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान करण्यांत येते कीए नोंदणी केलेल्या शेतकन्यांनी आपला उत्पादीत मका शासकीय धान्य गोडाऊन मध्ये विक्रीकरिता आणावा असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी केले आहे. Mul









