सावली तालुक्यातील जनकापूर रिठ येथील घटना
सावली : गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना सावली तालुक्यातील जनकापूर रिठ जंगलात दुपारी 12 वाजता दरम्यान घडली. विनोद नामदेव ठाकरे वय 48 वर्षै असे मृत्तक इसमाचे नांव आहे.
नविन वर्षाच्या आगमनाने वाघाच्या हल्याच्या घटना मूल आणि सावली तालुक्यात घडली, मूल तालुक्यातील कवळपेठ येथील शेतकरी गंगाराम शेंडे यांच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले तर सावली तालुक्यातील जनकापूर येथील गुराखी विनोद नामदेव ठाकरे हे वनविकास महामंडळाच्या पाथरी क्षेत्रातील जनकापूर रिठ जंगलात जनावरांना घेवुन चराईसाठी गेला होता, यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विनोद नामदेव ठाकरे वय 48 वर्षे यांच्यावर हल्ला चढवित जागीच ठार केला, सदर घटनेची माहिती गुराख्यासोबत गेलेल्या इसमानी वनविभागाला दिली. वनविकास महामंडळाचे क्षेत्र सहा. डि.. एन. ढोले. व कर्मचाऱ्यानी जनकापूर येथील कंर्पामेंट नं. 147 मध्ये जावुन पंचनामा केला, उत्तरीय तपासणीसाठी मृत्तदेह सिंदेवाही येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. वनविभागाने 25 हजार रूपयाची आर्थीक मदत कुटुंबियांकडे सुर्पुद करण्यात आली.