वाघाच्या हल्यात शेतकरी जखमी

मूल तालुक्यातील कवळपेठ येथील घटना
मूल :  24 तासापूर्वी वाघाच्या हल्यात युवक ठार झाल्याची घटना ताजी असताना आज शनिवारला दुपारी 12 वाजता दरम्यान चिचपल्ली वनपरीक्षेत्रातील मूल क्षेत्रातील कवळपेठ येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन जखमी केले. गंगाराम कान्हूजी शेंडे वय 58 वर्षे रा. कवलपेठ असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मूल तालुक्यातील कवळपेठ हे गाव चिचपल्ली वरपरीक्षेत्राअंतर्गत येत असून यापरिसरात वन्यजीव मोठ्या प्रमानात आहेत. 24 तासापूर्वी डोणी येथील 23 वर्षीय युवक वाघाच्या हल्ल्यात जागीच ठार झाल्याची घटना ताजी असताना आज शनिवारी कवळपेठ येथील गंगाराम कान्हूजी शेंडे वय 58 वर्ष हा स्वतःच्या घरचे जनावरे चराईसाठी यशवंत चलाख यांच्या शेतात घेऊन गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करुन जखमी केले. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी शेतकऱ्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन सामान्य रुग्णालय चंदपूर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले.

चिचपल्ली वनपरीक्षेत्राच्या वनपरीक्षेत्राधिकारी प्रीयंका वेलमे यांचे मार्गदर्शनात मूलचे क्षेत्र सहाय्य्क प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, शितल चौधरी करीत आहे जखमी शेतकऱ्याच्या उपचारासाठी वन्यजीव रक्षक उमेशसिह झिरे यांनी विशेष प्रयत्न केले