युवा शेतकऱ्याची आत्महत्या

मूल : तालुक्यातील टेकाडी येथील युवा शेतकऱ्याने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील टेकाडी येथे रविवारी दुपारी 3 वाजता दरम्यान उघडकीस आली. बालाजी शंकर कोटरंगे वय 37 वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.

अतिवृष्टीच्या पावसामुळे टेकाडी परिसरात मोठया प्रमाणावर धानपिकाचे नुकसान झालेले होते, शेती करण्यासाठी लावलेले पैसे सुध्दा अनेक शेतकऱ्याचे निघालेले नाही, मूल तालुक्यातील टेकाडी येथे शंकर कोटरंगे यांची शेती आहे. सदर शेती त्यांचा मुलगा बालाजी कोटरंगे हा करीत होता, काही दिवसापुर्वी शेतातील मळणी केली, मात्र पाहिजे त्याप्रमाणावर त्यांना धान झालेले नाही यामुळे तो अस्वस्थ होता, दरम्यान रविवारी दुपारी 3 वाजता दरम्यान तो स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेवुन आत्महता केल्याच्या स्थितीत घरच्याना आढळून आला. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अजुन कळले नाही, मूल पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे.