उमेदच्या वतीने ताडाला येथे ग्रामस्वच्छता

मूल :  महराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान अंतर्गत असलेल्या ताडाळा येथील ग्राम संघाच्या महिलानी ताडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

ग्रामीण भागात ग्राम स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे., ताडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी येथील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा सुनंदा वनकर,, सचिव वर्षा सोयाम, ग्राम पंचायतच्या माजी सरपंच वैशाली सोयाम, शाळा व्यवस्थ्ज्ञापन समितीच्या उपाध्यक्ष शिल्पा पिरसिंगुलवार, अंगणवाडी सेविका माया गंगुलवार, किरण निमगडे, मंगला तेलावार, विद्या दहिवले, सुरेखा गणवीर यासह बचत गटाच्या सदस्या, गावातील महिला मोठया संख्येने स्वच्छता अभियानात सहभागी झाल्या होत्या.