कॅन्सरग्रस्त वृध्द महिलेला आर्थीक मदत

आरोग्य क्षेत्रात जिल्हा बँक व ट्रस्टद्वारा मदतकार्य सुरु राहील, रुग्णांनी लाभ घ्यावा : रवि शिंदे

अतुल कोल्हे  (भद्रावती)
चंद्रपुर जिल्ह्यात कॅन्सरग्रस्तांचे प्रमाण वाढत आहे. वाढते प्रदूषण, रासायनिक शेती, उद्योगांमुळे होत असलेली पाण्याची व हवेची खराब गुणवत्ता व बदलती जिवनशैली या सर्वांचा परीणाम शरीरावर होवून जिल्ह्यात कॅन्सरसारखे गंभीर आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जनतेनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रात जिल्हा बँक व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारा मदतकार्य सुरु आहे. रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवि शिंदे यांनी केले.

जिल्हा बँकेच्या ‘शेतकरी कल्याण नीधी’ योजनेअंतर्गत आजमितीला जिल्ह्यातील शेकडो कॅन्सरग्रस्तांना भरपाई देण्यात आली आहे. तालुक्यातील कुडरारा येथील सौ. कुसूम जंगलुजी ऊरकुडे गेल्या काही महीण्यांपासुन कॅन्सर या आजाराशी झुंज देत आहेत.

सदर माहिती मिळताच, आज (दि.३) ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भद्रावती यांचे सौजन्याने बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत व संचालक डॉ. विजय देवतळे यांचे सहकार्याने व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक रवींद्र शिंदे यांचे हस्ते कुसूम जंगलुजी ऊरकुडे यांना बँकेचे ‘शेतकरी कल्याण नीधी’ योजनेअंतर्गत मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी रवि शिंदे, भास्कर ताजने, सुनिल मोरे, प्रदिप देवगडे, गजविन्द्र भोयर, दिलिप गहुकर, आनंदराव पिजदुरकर, भारत कूत्तरमारे, नथ्थुजी बोढे, जंगलुजी ऊरकुडे, संदीप गोहोकर, गुणवंत पिजदुरकर व गावकरी उपस्थित होते.

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांनी बँकेच्या विविध कल्याणकारी योजना असुन गंभीर आजाराच्या रुग्णांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. सोबतच ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या कामांची व योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पालकांच्या, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व गरीब-गरजु कूटुंबातील पाल्यांच्या विवाहाचा खर्च ट्रस्ट करणार असुन त्याबाबतची नोंदणी अभियान सुरु झाले आहे. इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च ट्रस्ट उचलत आहे. तेव्हा गरजुंनी ट्रस्टच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवि शिंदे यांनी यावेळी केले.