सिंधूताई सपकाळ काळाच्या पडद्याआड

पुणे : महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे  पुण्यातील  गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते, त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते, आज अखेर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी 2021 मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं. ‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत.

सिंधुताई सपकाळ यांना दे धक्का एक्सप्रेसच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली!