आरोग्य तपासणीसाठी क्राईस्टची चमु टेकाडीत

आरोग्य तपासणीला भरघोष प्रतिसाद
मूल : तालुक्यातील टेकाडी येथे चंद्रपूर येथील क्राइस्ट हॉस्पीटलच्या चमुने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केले होते. याशिबीराला नागरीकांनीही भरपोष प्रतिसाद दिला..

चंद्रपूर येथील क्राईस्ट हॉस्पीटला 20 वर्षे पुर्ण झाले, यानिमीत्ताने मूल तालुक्यातील टेकाडी येथे जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार यांच्या पुढाकारातुन आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.. शिबीराला क्राईस्ट हॉस्पीटलच्या डॉ. अंजु कामडी यांच्या नेतृत्वात सुदेश शंभरकर, आकाश उमरे, उर्मीला नवले, वर्षा गोमासे हया प्रामुख्याने उपस्थित राहुन रूग्णांची तपासणी केले.

आरोग्य तपासणीला टेकाडी परिसरातील सुमारे 300 रूग्णांची तपासणी करण्यात आली, तपासणी केलेल्या रूग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आले.
आरोग्य तपासणीसाठी टेकाडीचे सरपंच सतिष चौधरी, ग्राम पंचायत सदस्य किरणताई चौधरी, लिनाताई गोवर्धन, सामाजिक कार्यकर्ते  किसन गुरनुले, आनंदराव गोहणे, रवि चौधरी, सुनिल कामडी, अंजनाताई गोहणे यांनी अथक परिश्रम घेतले.