१३ ते १७ जानेवारीला गोंदेडा येथे ६२ व गुंफा महोत्सव

पळसगांव (पिपर्डा ) : येथून जवळच असलेल्या विदर्भाची पंढरी समजली जाणारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत श्रीक्षेत्र गोंदेडा गुंफा ६२ वा गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सवा साजरा होणार आहे.

कोविड १९ची धार्मिक सण -उत्सवावरील बंदी लक्षात घेता शासनाच्या कोरोना नियमावलीच्या अधीन राहून अगदी साध्या पद्धतीने मर्यादित गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा उसत्व साजरा करण्यात येणार आहे.

दिनांक १३ जानेवारी पासुन अगदी साद्या पद्धतीने ग्रामस्वच्छता करून सामुदायिक ध्यान,रामधून,ग्रामगीता वाचन,सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी आणि रात्रौला भजन हे कार्यक्रम होतील.दि १७ जानेवारीला दुपारी ह.भ.प.काळे महाराज यांच्या हस्ते गोपालकाला व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.अगदी सादया पद्धतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या महोत्सवात वंदनीय तुकडोजी महाराजाणा अभिवादन करण्यासाठी व महाराज्याचा पदस्पर्शाने दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक हजेरी लावत होते.गावातील हजारो भाविक हजेरी लावत होते.या वेळेस मात्र कोरोनाच्या अटी व शर्ती नुसार जास्त गर्दी न करीता गुंफा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.