इंदिरानगरातील नाल्या व रस्त्यांची समस्या कायम

इंदिरा नगरातील समस्या सोडवा – नागरिकांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : मूल शहरातील इंदिरा नगर वार्ड क्रमांक 11 येथे विविध समस्या कायम आहेत. नाल्या पाण्याने आणि चिखलाने संपूर्ण भरलेल्या असून अनेक ठिकाणी जाम झाले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून विविध त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

इंदिरानगर वॉर्डातीलच अल्का कतरोजवार ते इंद्रजित मेश्राम यांचे घरासमोरील रस्ताच्या दुरुस्ती अभावी  अनेक ठिकाणी फुटलेला आहे. रस्त्यावर पाणी जमा आहे. रस्त्याचे काम करण्याकरिता आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष अमित राऊत यांनी नगर पालिकेला काही दिवसाआधी  निवेदन देण्यात आला आहे. यावर मुख्याधिकारी यांनी सकारात्मक विचार व्यक्त केला होता.मात्र यावर अजूनही कुठलीही कार्यवाही झाली नाही.

इंदिरा नगर हा जुना वार्ड आहे, झोपडपट्टी परिसर म्हणूनही ओळखल्या जाते. गरीब, मजुरांचा वॉर्ड आहे. परिसरातील घरे जुनी, कवेलूचे, मातीचे घरे आहेत. रस्त्यावर पाणी साचून असल्याने आणि नाल्या उपसले नसल्याने घरांच्या भिंतीना ओलावा येत असतो. त्यामुळे घर कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्ता दुरुस्ती अभावी  वार्डातील नागरिकांना व ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, याच रस्त्यावरून आठवडी बाजारात नागरिक जातात  यामुळे सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे         तालुकाध्यक्ष अमित राऊत व वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.