मारोडा येथील शेतकऱ्यांची आत्महत्या

मूल : सततच्या नापिकी आणि अतिक्रमण केलेल्या जमिनीवर वनविभागाने कब्जा केल्याने मारोडा येथील शेतकऱ्यांनी निराश होत स्वतःच्या शेताजवळील चौधरी यांचा शेतात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी 5 वाजता दरम्यान उघडकीस आली. नामदेव भदरूजी मानकर वय 65 वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नांव आहे.

मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर शेतकरी आहेत, शेती करून आपली उपजिवीका करीत असतात, मात्र यावर्षी अनेक शेतकऱ्यांना पाहिजे त्याप्रमाणावर धानपिकाचे उत्पन्न झालेले नाही, दम्यान मूल तालुक्यातील मौजा मारोडा येथिल अल्पभुधारक शेतकरी नामदेव भदरूजी मानकर वय 65 वर्षे यांनी आपल्या शेता जवळील चौधरी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली.

सदर शेतकऱ्यांची मारोडा शेतशिवारात 1 एकर शेती आहे, यासोबतच मागील अनेक वर्षापुर्वी शेतीला लागून असलेल्या वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करुन शेती करत होता मात्र काही दिवसापूर्वी वनविभागानी शेतीचे अतिक्रमण काढून जमीन आपल्या कब्जात घेतल्याने तो नेहमी नाराज राहत असल्याची चर्चा आहे.

पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा करुन मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.