चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार कोरोना पॉझिटिव्ह

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती

चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांची कोवीड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्या सध्या होमक्वारंटाइन आहेत, फेसबुक पोस्ट माध्यमातून त्यांनी हि माहिती दिली आहे.

14 जानेवारीपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती त्यामुळे त्यांनी काल रविवारी चाचणी करून घेतली. सोमवारी त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्या positive असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी. बाहेर फिरताना मास्कचा वापर करा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

दरम्यान महापौरांचे पती भानापेठ प्रभागाचे नगरसेवक संजय कंचर्लावार हे देखील कोरणा पॉझिटिव असून, ते गृह विलगीकरणमध्ये आहेत.