नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

किसान युवा क्रांती संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

अतुल कोल्हे भद्रावती :-
भद्रावती तालुक्यात सतत तीन दिवस गारपिट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असुन तालुक्यात काही भागात जोरदार व काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे भरपूर नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत दयावी अशी मागणी किसान युवा क्रांती संघटनेने केली आहे.

कापूस, तूर, गहू, हरभरा, वाटाणा, मिरची, मुंग व भाजीपाला पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून आधीच आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी अस्मानि संकटात सापडला आहे. तरी लवकरात लवकर मदत दयावी अशीं मागणी किसान युवा क्रांती संघटनेने मा. तहसीलदार अनिकेत सोनवणे यांना निवेदनामार्फत केली आहे. यावेळी अध्यक्ष रवींद्र गेजिक तथा विकास गजभे, भारत बेलेकर, रोशन मानकर, अजय मत्ते, अभिशेक भोयर, पन्कज पन्डीले आदी उपस्थित होते.