शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था नियमीत सुरू करा

क्रांतीज्योत सेवा संघाची मागणी

मूल (प्रतिनिधी) : कोरोना संक्रमणामुळे राजयातील शाळा, महाविद्याल बंद करण्यात आले असुन यामुळे विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत आहे शासनाने तात्काळ शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था सुरू करावी अशी मागणी क्रांतीज्योत सेवा संघाच्या वतिने राज्याचे मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन मूलच्या उपविभागीय अधिकाÚयामार्फत पाठविण्यात आले आहे.

राज्यात कोरोना रूग्णाच्या संख्येत भर पडत असल्याने शासनाने राज्यातील शैक्षणिक संस्था, प्रश्क्षिण संस्थेला सुट्टी देण्यात आली आहे, यामुळे बहुतांष शाळेनी ऑनलाईन शिक्षण सुरू केलेले आहे, मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शारिरीक आणि मानसिक समस्या निर्माण होत आहे, ग्रामीण भागात नेहमीच नेटवर्कची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षणात खंड पडत असल्याने गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित राहावे लागत आहे, अनेक विद्यार्थ्यांकडे भ्रमणध्वनी, लॉपटॉप नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेवु शकत नाही, भ्रमणध्वनी आणि लॉपटापचे विद्यार्थ्यांना अपुणे ज्ञान असल्याने हाताळताना त्रास होत आहेत, ग्रामीण भागातील मजुरी दिवसभर मजुरी करण्यासाठी जात असल्याने मुलांकडे विशेष लक्ष देता येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

कोरोना संसर्गामुळे शासनाने लावलेल्या जाचक अटी व शती शिथील करून शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात यावे अशी मागणी क्रांतीज्योत सेवा संघाचे नंदु बारस्कर, रविंद्र चौधरी, प्रमोद गेडाम, लक्शन वाढई, विट्ठल लेनगुरे, सतिश चौधरी, गजानन चौधरी, ओमदेव मोहुर्ले, गुलाब शेडे, गिरीधर चौधरी, पाटील वाळके यांनी केली आहे.