वाघिणीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी वनविभागाच्या ताब्यात

विद्युत तारांच्या स्पर्शाने वाघिनीचा झाला होता मृत्यू
कुजलेल्या अवस्थेत मिळाला होता वाघिणीचा मृतदेह

अतुल कोल्हे भद्रावती 
तालुक्यातील चालबर्डी (कोंढा ) शिव रस्त्यालगत वाघीणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. हा मृत्यू जिवंत विद्यूत तारांच्या स्पर्शाने झाल्याचे निष्पन्न झाले. केली आहे. मात्र आरोपी गवसत नव्हता. अखेर वनविभागाचे हात आरोपी पर्यंत पोहचले. याप्रकरणी कोंढा येथील शेतकरी तुकाराम वामन मत्ते वय ५३ वर्ष राहणार कोंढा याला वनविभागाने अटक केली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने घटनास्थळापासून तब्बल दीड किलोमीटर अंतरावर वाघिणीचा मृतदेह बैलबंडीने नेल्याचे तपासात पुढे आले आहे.

तुकाराम मत्ते यांचे कोंढा येथे स्वतःच्या मालकीची शेती असून ते नेहमीच शेतमालाच्या सुरक्षेसाठी शेतातील कुंपणाला शेतातील ११ के.व्ही. असलेला विद्युत प्रवाह लावत होता,  ३ जानेवारीरोजी चार वर्षे वयाची पट्टेदार वाघिण जिवंत विद्युत प्रवाहाची बळी ठरली. ही घटना तुकाराम मत्ते यांना माहिती होताच त्यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी शेतात मृत पावलेल्या वाघिणीला स्वतःच्या बैलबंडी वर शेतापासून दीड किमी अंतरावर चालबर्डी शिव रस्त्यावर आणून टाकले होते. वन विभागाच्या चौकशीनंतर आरोपीला सोमवारला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाचा एफ सी आर मिळाला ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एच पी शेंडे, क्षेत्र सहाय्यक एन व्ही हनवते, वनरक्षक प्रशांत गेडाम यांनी केली.