रस्त्यावर अस्वल व दोन पिल्ल्याचा ठिय्या

अस्वल बघण्या करीता नागरीकाची गर्दी

चिमुर (प्रतिनिधी) : तालुक्यातील विहीरगाव -वडसी रोडलगत असलेल्या शेतशेवारात अस्वलीने दोन पिल्लू घेऊन शेतात दोन दिवसांपासून ठिय्या मांडल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विहीरगाव येथील शेतकरी अशोक रामटेके यांच्या शेतात अस्वलीने आपल्या दोन पिल्लांना घेऊन शेतात ठिय्या मांडला असून ती पिल्ले घेऊन त्या परीसरात फिरत आहे. शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण असुन शेतकऱ्यांनी शेतात काम करणे बंद केले असून त्या परीसरात वन विभागाचे कर्मचारी पहारा देत आहेत.अस्वल पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.