दोन वेगवेगळ्या ठिकाणी कोंबड बाजारावर धाड

दहा आरोपी अटकेत

अतुल कोल्हे भद्रावती
तालुक्यातील चिरादेवी झुडपी जंगलात व मांगली झुडपी जंगलात अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी चालत असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी धाड टाकुन येथील दहा आरोपीला अटक करण्यात आली आहे..त्यांच्याकडून एक लाख 62 हजार रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे.

पहिल्या कारवाईत गणपत मेश्राम 39 ढोरवासा, विजय पुरडकर 48 ढोरवासा, निलेश घाटे 28 गौराळा, नरेश पुणेकर 42 भद्रावती, अरशद शेख 27 भद्रावती, भास्कर बावणे गौराळा ,रवी मिटपल्लीवार 34 भद्रावती अशी आरोपींची नावे आहे हे चिरादेवी गावालगत झुडपी जंगलात कोंबड्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत होते. तर दुसऱ्या कारवाईत श्रीकांत सुरपाम 31 ताडाळी, उमेश आमदे 36 माजरी, सुमित पिदुरकर 24 माजरी असे आरोपींची नावे आहे. हे मांगली झुडपी जंगलात कोंबड्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत होते या दोन्ही कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल असा एक लाख 62 हजार जप्त करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात गजानन तेलरांधे पोलीस उपनिरीक्षक शशांक बदामवार, जगदीश झाडे, निकेश ढेंगे ,अजय झाडे, रोहित चिटगिरे, विश्वनाथ चुधरी यांनी केली.