अल्ट्राटेक सिमेंट कंपनीतील कामगाराचा मृत्यू

मृतदेह गेटवर ठेवुन आंदोलन

गडचांदूर (प्रतिनिधी)  : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये काम करीत असलेल्या कामगारांला चक्कर आल्याने त्याचा मृत्यु झाला, सदर घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. प्रकाश देवाजी पवार वय 43 वर्ष असे मृतक कामगारांचे नाव आहे.

गडचांदूर माणिकगड सिमेंट कंपनीत आता नवीनच अल्ट्राटेक सिमेंट कंपनी या नावाने सुरू आहे. 26 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास प्रकाश देवाची पवार वय 43 वर्ष हे कामावर असतांना त्यांना चक्कर येऊन मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती शहरात पसरली, असता अनेक कामगार, सामाजिक संघटना व इतर पक्षातील पदाधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली, व कंपणिकडून कामगाराला नुसकान भरपाई देण्याची मागणी केली मात्र कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याने, योग्य मोबदला मिळण्यासाठी कामगाराचे मृतदेह कंपनीच्या गेट समोर ठेवले असून त्या ठिकाणी कंपनीच्या विविध कामगार संघटनांनी नुकसान भरपाईची मागणी करीत आंदोलन सुरू केले. मात्र अजून पर्यंत कंपनीकडून कुठलाही निर्णय घेतला नसल्याची विश्वसनीय माहिती आहे. कामगाराच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई जो पर्यंत देण्यात येणार नाही, तो पर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही. असा इशारा कंपनीला व कंत्राटदाराला देण्यात आला. अनेक वर्षापासून कामगार हे कंत्राटदार मार्फत कंपनीत कामावर आहेत.

मृतकाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई बाबत मध्यस्ती सुरू आहे. बातमी लिहेपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. घटनास्थळावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.