वेळप्रसंगी जेलात जाऊ मात्र शहर प्रदुषीत होवु देणार नाही : एकताताई समर्थ Pollution

Pollution
Pollution

मूल येथील रेल्वे मालधक्का नागरीकांचा तिव्र विरोध

मूल (प्रतिनिधी) : कर्मविर मा. सा. कन्नमवारांची कर्मभुमी म्हणुन प्रसिध्द असलेल्या मूल शहर हे स्मार्ट सिटी म्हणुन गणल्या जातो, याशहरात काही दिवसांपासुन रेल्वे मालधक्का सुरू करण्याचे कुटील डाव काही लोकांकडुन सुरू आहे, केवळ स्वार्थासाठी सुरू असलेला हा डाव मूल शहराचे सौंदर्य नष्ट करून प्रदुषीत शहर करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तोप्रयत्न माझे सहकार्यासोबत हाणुन पाडु, वेळप्रसंगी आम्हाला आंदोलन करून जेल मध्ये जाण्याची वेळ आली तरी जेल मध्ये जावु मात्र मूल शहर प्रदुषित होवु देणार नाही असे मत मूलच्या नगराध्यक्ष एकतताई प्रशांत समर्थ यांनी पत्रकार परिषदेत ऑनलाईन बोलताना व्यक्त केले. Mul City

Pollution1
Pollution1

मूल येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती, सदर पत्रकार परिषदेत मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित मालधक्काला कडाडुन विरोध करीत आंदोलनाची भुमिका ठरविण्यात आली आहे. मूल रेल्वे स्थानकावर प्रस्तावित मालधक्का उभारून सुरजागड येथील लोहखनिजाची देशभर वाहतूक करण्याची योजना सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेसाठी काही राजकीय नेत्यांकडून मदत केली जात असल्याचा आरोप असून, या पार्श्वभूमीवर मूल शहर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मालधक्का हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन समितीने केले आहे.

Pollution2
Pollution2

दररोज सुमारे 700 ते 800 अवजड (हायवा) वाहनांची वाहतूक होणार असल्याने अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सुरजागड परिसरातून होणाÚया लोहखनिज वाहतुकीदरम्यान बारीक धूळ आणि रासायनिक घटक हवेत व जमिनीवर पसरून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊ शकते. त्यामुळे परिसर लालसर होण्याची आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्रस्तावित मालधक्क्याच्या लगतच कर्मवीर महाविद्यालयाचे सार्वजनिक मैदान आहे. येथे दररोज नागरिक व्यायामासाठी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात. या परिसरात मालधक्का उभारल्यास अशा उपक्रमांवर परिणाम होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. याशिवाय, नवभारत विद्यालय, नवभारत कन्या विद्यालय, नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कर्मवीर महाविद्यालय तसेच पंचायत राज प्रशिक्षण केंद्र या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था मालधक्क्याच्या परिसरात असल्याने त्यांच्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित मालधक्का हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत असून, या परिसरात वाघ, अस्वल, बिबट यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर आहे. हा भाग वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गाचा (कॉरिडॉर) भाग असल्याने मालधक्का उभारल्यास वन्यजीवांचे नुकसान होण्याची तसेच मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली. Polluted

Pollution3
Pollution3

मूल शहरातून सुरजागड येथील लोहखनिज वाहतुकीसाठी प्रस्तावित रेल्वे मालधक्का तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी मूल शहर बचाव संघर्ष समितीने केली आहे. अन्यथा, विविध स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने यावेळी दिला आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे अनिल मोगरे, जिवन कोंतमवार, अॅड. प्रणव वैरागडे, अॅड. अश्वीन पॉलीकर, जेष्ठ पत्रकार संजय पडोळे, विजय सिध्दावार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, प्रा. प्रशांत वासाडे, दिनेश गोयल, कैलास चलाख, डेव्हिड खोब्रागडे, संदिप मोहबे, विवेक मांदाडे, सभापती नलिनी आडपवार, नगरसेवक अतुल गोवर्धन यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.